दि.०५ कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्वत्र जनजीवन विस्कसळीत झाले आहे तर वाहतूक सेवा पूर्णतः कोलमडून गेली आहे.कोविड 19 वाढत्या प्रादुर्भावामुळे कर्जत माथेरान मिनी बस सेवा पूर्णतः बंद करण्यात आली आहे.परंतु सध्या तरी राज्य सरकारने राज्य परिवहन महामंडळाच्या बसेस काही ठिकाणी सुरू केल्या आहेत.
माथेरान मधील नागरिकांना आपल्या दैनंदिन जीवनातील व्यवहारात या बंद केलेल्या बसेस मुळे खूपच अडचणींना सामोरे जावे लागत आहे.खाजगी वाहनाने प्रवास करणे खूपच महाग, त्रासदायक अवाजवी दरामुळे कर्जत इतर ठिकाणी जाणे शक्य होत नाही.याकामी कर्जत ते माथेरान मिनीबस सेवा लवकरात लवकर सुरू करण्याचे प्रेयत्न करावे अशा आशयाचे निवेदन नगराध्यक्ष प्रेरणा सावंत यांनी कर्जत आगर व्यवस्थापक यांना सुपूर्त केले आहे त्यामुळे नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे.

No comments:
Post a Comment